Posts

कालव्याची कालवा कालव

                                                                                         दि. २९ सप्टेंबर २०१८  २७ सप्टेंबर २०१८ सकाळची गडबड संपवून वस्तीतील महिला, घरातील उरले सुरले काम आटोपत होत्या, काही जण आपापल्याला मुलांना शाळेत सोडायला निघालेले, तर काहीजण परत आणायला.... सारं कसं अगदी रोजच्या सारखं चाललं होतं.... पण एवढ्यात गिल्ला झाला, पाणी पाणी पाणी ........  पाहता पाहता पाण्याचा जोरदार लोंढा रस्त्यावरून वाहू लागला. पाण्याचा जोर इतका प्रचंड होता कि वाटेत जे येईल ते पार बुडून, वाहून जाऊ लागले. पाऊस नसताना, रणरणत्या उन्हात एवढे जलौघ आला तरी कुठून ???? कोणी तरी ओरडले कालवा फुटला......  कालवा फुटला ..... आणि पाहता पाहता वाटेत येईल त्याला भुसपाट करत आपल्यासोबत ओढत, फरपटत.. पाण्याचे लोंढेच्या लोंढे आजूबाजूच्या घराघरातून घुसले, तकलादू पत्...

इंडिया! इंडिया !! इंडिया !!!

------------------------------------------------------------------ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी जवळ आले कि एक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत असते कि भारताला इंग्रजी मध्ये INDIA असे का म्हणतात ? त्याचे कारण असे सांगितले जाते की ; I - Independent   N- Nation D- Declared  I - In A- August आणि   वरून असेही सांगितले जाते कि INDIA हे नाव स्वा. सावरकरांनी सुचवलेले आहे. आमची सुज्ञ भारतीयांना नम्र विनंती आहे कि असल्या भंपक आणि तद्दम खोटारड्या पोस्टवर  आजिबात विश्वास ठेवू नका.   मुळात ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालेला भारत हा एकमेव देश नाही. भारताप्रमाणे , पाकिस्तान , कोरिया , काँगो असेही देश ऑगस्ट मध्येच स्वतंत्र झाले होते. तसेच इंडिया हा शब्द किमान २०० वर्षे जुना आहे , १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देखील हा शब्द अस्तित्वात होता. १८५७ च्या उठावावेळीची एक प्रसिद्ध घोषणा होती " खुल्क खुदा का , मुल्क बादशाह का , अमल कुंपणी सरकारका " या मधले कुंपणी सरकार म्हणजे " ईस्ट इंडिया कंपनी " चे सरकार होय. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेला (१९४२) ...

समग्र रामदास ऍप

Image
" समग्र रामदास ऍप " समर्थ श्रीरामदासस्वामींच्या समग्र वाङ्मयाचा समावेश असणारे App ......जय जय रघुवीर समर्थ !! समर्थभक्त सज्जनहो, राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदासस्वामी महाराज ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद्भुत आणि अद्वितीय संत ! बालवयातच विश्वाच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या आणि अवघ्या बाराव्या वर्षीच ऐहिक सुखाचा त्याग करून श्रीरामरायाच्या अोढीने बाहेर पडलेल्या श्रीसमर्थांनी पुढे बारा वर्षे तपश्चर्या - पुरश्चरण करून श्रीरामाला प्रसन्न केले. तीर्थाटनातून हिंदुस्थानातील परकीय सावटाची जाणीव होताच संघटन करून कित्येक समाजविधायक कार्ये समर्थांनी केली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक इत्यादी सर्वच विषयांवर समर्थांनी चोख व आजच्या भाषेत सांगायचे तर अतिशय विज्ञानवादी मार्गदर्शन त्याकाळातच करून ठेवलेले आहे. काय त्यांची क्रांतदर्शी प्रतिभा ! आपल्या विपुल अशा वाङ्मयामधून आध्यात्मिकासोबतच व्यावहारिक विषयांवर समर्थांनी मांडलेले  विचार आजही जसेच्या तसे उपयोगी पडणारे आहेत. कारण तेच शाश्वत आहेत ! आजच्या प्रगत काळाची गरज ओळखून,...

विनम्र आवाहन !!!

।। जय जय रघुवीर समर्थ ।। सप्रेम नमस्कार !!! श्री आत्माराम महाराज कृत श्रीरामदासपंथक्रमसार या 102 वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या  ग्रंथाचे प्रकाशन  सत्कार्योत्तेजक सभा धुळे तर्फे 24 जून 2018 रोजी धुळे येथे झाले. धुळे  येथील श्री सत्कार्योत्तेजक सभा आणि श्री समर्थ वाग्देवता मंदिर या दोन्ही  संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या  या समर्थ  सेवेचे खरोखर च कौतुक  करावेसे वाटते. श्री रामदासपंथक्रमसार हा श्री आत्माराम महाराज एक्केहाळीकर यांचा ग्रंथ  म्हणजे प्रत्येक रामदासी  सांप्रदायिकासाठी एक आदर्श  आचार्य संहिता सांगणारा ग्रंथ  आहे. फक्त 16 अध्याय आणि 548 ओव्या असणा-या या ग्रंथाची " सारांचेही सार " ही अप्रतिम  प्रस्तावना  समर्थ ह्रदय श्री नानासाहेब देव धुळे यांनी लिहिलेली आहे . या ग्रंथाची किंमत  फक्त रू 50/- आहे.  आपण इतर सांप्रदायिक  व्यक्ती आणि  इतरांना  हा अमूल्य  ग्रंथ  भेट म्हणून  पण देऊन समर्थ  विचारांचा  प्रचार करू शकता. श्री स...

आज गुरू पौर्णिमा.....

|| जय श्रीराम || समर्पण, त्याग आणि शौर्य यांची शिकवण देणारा परम पवित्र भगवा ध्वज . योग आणि सामर्थ्य यांच्या द्वारे समाजसेवा शिकवणारे सद्गुरू नवनाथ.  चळवळीचे सामर्थ्य शिकवणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी.   धर्मासाठी झुंझावे   ही शिकवण ज्यांच्या चरीत्रातुन मिळते असे, छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज . परिवर्तन, परिस्थितीला शरण जाऊन नाही तर तिच्यावर आक्रमण करून घडते अशी शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा.तात्याराव सावरकर.   वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कुटुंबिय, व्यवसायीक, समाजबांधव, संघटन सहकारी  आणि मित्रपरिवार यांना  गुरूपौर्णिमे निमित्त त्रिवार वंदन . श्रीपाद श्रीकांत रामदासी