Posts

सावरकरांना भारतरत्न का द्यावे ?

Image
।। श्रीराम ।। विनायक दामोदर सावरकर  २८ मे १८८३ - २६ फेब्रु. १९६६   दि. १६-११-२०१८   रोजी   वीर बाजी पासलकर स्मारक ,   सिंहगड रस्ता पुणे.  येथे केलेल्या भाषणाचा सारांश.... नमस्कार ! स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी , सावरकर प्रेमींच्या सह्या घेण्याचा उपक्रम श्री.सुनील मारणे सुरु करत आहेत. त्या संदर्भातील एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मला सावरकर अभ्यासक या नात्याने , सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? हा विषय मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्या प्रसंगी , ३५ मिनिटे चाललेल्या भाषणाचा सारांश वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. याप्रसंगी , श्री.सुनील मारणे , श्री.बाप्पू शिळमकर , श्री.प्रीतम बहिरट , श्री.केतन घोडके , स्तंभलेखक तुषार दामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वां अहं यशोयुतां वंदे ।। स्वातंत्र्यदेवतेला भगवतीचे (देवीचे) रूप मानणारे आणि परवशतता , जातीय उच्चनीचतेच्या अंधकाराने हतबद्ध झालेल्या भारतीय जनतेस आपल्या...

हिंदूसेनानी अशोकजी सिंघल

Image
अशोक सिंघल बाळासाहेब ठाकरे हिंदूसेनानी अशोकजी सिंघल संकलन शब्दांकन : श्रीपाद श्रीकांत रामदासी _________________________________________________________________ जेंव्हा कधी हिंदूंचा आधुनिक काळातील इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्याच्यामध्ये  दोन व्यक्तिमत्त्वांना विशेष स्थान असेल त्या दोन व्यक्ती म्हणजे , स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय हिन्दुसेनानी अशोकजी सिंघल. आज १७ नोव्हेंबर या दोनही हिंदूवीरांचा स्मरण दिन. सर्वप्रथम या उभयतांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाळासाहेब ठाकरे माहीत नाहीत असा माणूस निदान महाराष्ट्रात सापडणे कठीण आहे ,  आणि जर सापडलाच तर त्याच्यासारखा करंटा तोच.  परंतु अशोक सिंघल हे नाव जरी भारतभर परिचित असले तरी , त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना विशेष माहिती नाही असे आम्हाला जाणवले , आणि म्हणूनच आजचा हा लेखन प्रपंच.  ज्याप्रमाणे पर्वताला मिठीत कवटाळता येत नाही , समुद्राला ओंजळीत उचलून घेता नाही त्याचप्रमाणे अशोक सिंघल हे व्यक्तिमत्व ,  त्यांचे कार्य काही  शे-पाचशे शब्दात मांडता येणे शक्य नाही. ...

लोहपुरुष : सरदार वल्लभभाई पटेल

Image
लोहपुरुष : सरदार वल्लभभाई पटेल || जय जय रघुवीर समर्थ || आज ३१ ओक्टोबर ...... अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. भारताचे पहिले उपपंतप्रधान... स्वतंत्र भारताचे अखंडत्व जपणारे शिल्पकार ... हैद्राबाद, जुनागढ येथील मस्तवाल निजामाना धूळ चारुन ही संस्थाने भारतात समाविष्ट करणारे लोहपुरुष.... सोमनाथ मंदिर निर्माणसाठी संसदेमध्ये कायदा करावयास भाग पाडणारे संस्कृती रक्षक ...... पाकिस्तानच्या घशात जाउ घातलेले लक्षद्वीप बेट मोठ्या हुशारीने भारताला मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व......... अश्या एका बहुआयामी कणखर व्यक्तीमत्वास लक्ष लक्ष प्रणाम.  लोहपुरुष ना इन जैसा कोइ जो जोड सका हिंदुस्तानको, नमन करें इस सरदारको भारत के असली कप्तान को    || भारत माता की जय || श्रीपाद श्रीकांत रामदासी        धायरी पुणे ४१

डॉ.ए पी जे अब्दुल कलाम

                                                                     ।। जय रघुवीर ।। आज १५ ऑक्टोबर..... भारताचे माजी राष्ट्रपती महामहिम मिसाईलमॅन,  डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. स्वतः एक वैज्ञानिक असूनही आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि मान्यता यांचा सदैव आदर करणारे एक महान देशभक्त अशी त्यांची ओळख सांगता येईल. डॉ. कलामानी जेंव्हा पहिले भारतीय बनावटीचे हावरक्राफ्ट बनवले तेंव्हा, त्याला 'नंदी' असे नाव दिले होते. त्याचप्रमाणे सर्वच क्षेपणास्त्राला देखील भारतीय संस्कृतीला साजेशीच नावे दिली आहेत, उदा. पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग आणि ब्रम्होस ई. डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याकरता त्यांचे " विंग्स ऑफ फायर" हे आत्मचरित्र वाचावे, याचा मराठी अनुवाद " अग्निपंख " या नावाने प्रकाशित झालेला असून मूळ चरित्राचा अनुवाद, प्रा. माधुरी शानभाग यांनी केलेला आहे. हे चरित्र सतत काहीतरी सकारात्मक कार्...

“ मी सिंहगड रस्ता बोलतोय ! ”

खमंग चिवडा या लेखनाचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही __________________________________________________________________________ “ मी सिंहगड रस्ता बोलतोय ! ” ©  श्रीपाद श्रीकांत रामदासी दचकलात का ?   रस्ता हा निर्जीव असतो मग तो बोलू कसा शकेल ? असा विज्ञानवादी प्रश्न आपणांस पडला असेल , पण पल्स पेक्षा इंपल्स वर जगणं शिकलं कि मग रस्तेच काय , जगातील कोणतीही चल-अचल , सचेतन-अचेतन , सजीव-निर्जीव वस्तू तुमच्याशी संवाद करू शकते. म्हणूनच इम्पल्स वर जगणाऱ्याना माझे बोलणे निश्चितच ऐकू येईल. सुमारे २१ किलोमीटरहुन अधिक लांबीचा डांबर , सिमेंट , खडी यांनी बनलेला मी सिंहगड रस्ता ,  सरकारी दरबारात , ' नरवीर तानाजी मालुसरे मार्ग ' असे माझ्या लांबीला शोभणारे लांबलचक  नांव असणारा एक पुणेरी रस्ता. माझे निश्चित वय मलाही आताशा आठवत नाही , खरे तर कोणत्याही रस्त्याचा जन्म हा त्याच्यावर जेंव्हा पहिला पथिक चालतो तेंव्हाच होतो. माझाही जन्म तसाच झालेला असावा. अर्थात तो पहिला पथिक कोण हे मलाही स्मरत नाही कारण आता तो इतिहास झाला आहे. इतिहासाचे पहिले पान प्रत...