Posts

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

Image
 छायाचित्र श्रेय : श्रीपाद श्रीकांत रामदासी  शिवरायांसी आठवावे , जीवित तृणवत मानावे ।। इहलोकी परलोकी उरावे , कीर्ती रूपे ।। या लेखांच्या पूर्वार्धातून,   छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती , स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती , धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न …. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजांनी स्वतःस (राजा या भूमिकेतून ) केंद्र स्थानी ठेऊन , अष्टप्रधान मंडळाची रचना तशीच चालू ठेवली होती . स्वराज्याची महसूल व्यवस्था प्रांत रचना , न्याय व्यवस्था , मुलकी कारभाराच्या व्यवस्था , देशमुख-देशकुलकर्णी यांचे अधिकार आदी बाबी तश्याच पुढे चालू ठेवल्या होत्या. इंग्रज-पोर्तुगीज-डच आदी व्यापारी मंडळींसोबत असणारे करार-मदार देखील तसेच पुढे चालू ठेवले होते. संभाजीराजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंशी झुंज देत , स्वराज्याचे रक्षण केले आणि विस्तारही केला हे सर्वश्रुत आहेच. परंतु कल्याणकारी राजां

शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

Image
  छायाचित्रकार : श्रीपाद श्रीकांत रामदासी तस्यात्मज: शम्भूरिती प्रसिद्ध: समस्तसामंतशिरोवतंस:। य: काव्यसाहित्यपुराणगीतकोदंडविद्यार्णवपारगामी ।। अर्थ : काव्य , अलंकारशास्त्र , पुराणे , संगीत , आणि धनुर्विद्या यात पारंगत असलेला , त्यांचा (छ. शिवाजीचा) मुलगा शंभू ; सर्व राजांच्या अग्रस्थानी शोभत आहे. ( संदर्भ: छ. संभाजी महाराज विरचित " बुधभुषणं " श्लोक १५) छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून , सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती , धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न …. ज्येष्ठ शुद्ध १२ शके १५७९ (आंग्ल दिनांक १४ मे १६५७) या शुभदिनी , माँसाहेब सईबाई यांचे पोटी पुरंदरगडावर संभाजीराजेंचा जन्म झाला. शिवरायांची कारकीर्द सुरू होउन पहिले दशक पूर्ण होत असताना संभाजीराजांचा जन्म झाला होता. त्यानंतर अवघ्या ३ वर्षा

सहजीवनाची ९ वर्षे .....

Image
  आज आमच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस म्हणजे सहजीवनाची , सहवेदनेच्या दशकाकडे वाटचाल सुरु झाली. खरं तर ही ९ वर्षे कधी सरली हे अजूनही कळतच नाही. [ कशी सरली हे पत्नीच्या लक्षांत आहे बरं का ] सर्वसाधारण जोडप्यामध्ये असणारे बंध (आणि बंधनसुद्धा) आमच्यामध्येही आहेत. ९ वर्षांचा स्मृतिगंध देखील आहे . अनेक अडचणी , पराजय , विजय , संघर्ष हे सारे आम्ही एकत्र राहूनच पाहिले , अजूनही पाहतच आहोत. आनंदाचे क्षण देखील भरभरून जगलो आहोत , अजूनही जगतो आहोत. अनेकदा अनेक गोष्टींतून बाहेर येण्याकरता , पुढे जाण्याकरता माझ्या पत्नीने निश्चित साथ दिली आहे पण तरीही मी म्हणेन की , माझ्या यशामागे मागे माझी पत्नी नाही ....... हो ! कारण ती प्रत्येक बाबतीत माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी जे काही मिळवले असेल (यश / अपयश)   त्यात तीला बरोबरीचे स्थान आहे . प्रत्येक मनुष्याचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने त्याचा संसार सुरु झाल्यावरच होते असे मला वाटते , पण संसार या शब्दाचा अर्थ नेमका काय असतो हे त्यात पडल्याशिवाय कळत नाही. संसार ..... यातलं  " सं " जे आहे ते संवादासाठी , " सा" सामंजस्यासाठी,   तर  &quo

सावरकर एक दीपस्तंभ : भाग ५ वा.

Image
                                                                    अमरवंश सावरकर  गांधी हत्या अभियोगातून निर्दोष आणि निष्कलंक मुक्तता झाल्यावर सावरकर प्रकृती स्वाथ्यासाठी बंगलोरला काहीदिवस राहून आले. तदनंतर त्यांनी पुन्हा कार्यास आरंभ केला पण पुढच्या काही महिन्यातच , १९ ऑक्टो १९४९ रोजी , नारायण सावरकरांचा मृत्यू झाला.   हा प्रसंग सावरकरांच्या मनाला चटका लावणारा होता ; " तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू " असा बंधुत्वाचा संदेश समाजाला देणाऱ्या सावरकरांच्या बंधूला , मात्र समाजकंटकांनी ठेचून ठेचून मारले. सावरकरांचे दोन्हीही बंधू कालवश झाले होते सावरकरांचे मन त्यावेळेस विच्छिन्न झाले होते परंतु   समाजाचे दुःख संपवण्यासाठी जगणाऱ्या महापुरुषांना स्वतः ची वैयक्तिक सुखेच नव्हे तर दुःखेदेखील बाजूला सारूनच मार्ग क्रमावा लागतो. सावरकरांच्या अंदमान सुटकेसाठी जर कोणी जीवाचा आटापिटा केला असेल तर तो नारायणरावांनीच. बाबाराव-तात्याराव यांच्या प्रमाणेच नारायणरावांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हे अमूल्यच आहे परंतु कालानुरूप आज नारायणरावांची विस्मृती झालेली दिसते. गांधीहत्या अभियोगा