Posts

Showing posts from August, 2018

इंडिया! इंडिया !! इंडिया !!!

------------------------------------------------------------------ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी जवळ आले कि एक पोस्ट सोशल मीडियावर वायरल होत असते कि भारताला इंग्रजी मध्ये INDIA असे का म्हणतात ? त्याचे कारण असे सांगितले जाते की ; I - Independent   N- Nation D- Declared  I - In A- August आणि   वरून असेही सांगितले जाते कि INDIA हे नाव स्वा. सावरकरांनी सुचवलेले आहे. आमची सुज्ञ भारतीयांना नम्र विनंती आहे कि असल्या भंपक आणि तद्दम खोटारड्या पोस्टवर  आजिबात विश्वास ठेवू नका.   मुळात ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालेला भारत हा एकमेव देश नाही. भारताप्रमाणे , पाकिस्तान , कोरिया , काँगो असेही देश ऑगस्ट मध्येच स्वतंत्र झाले होते. तसेच इंडिया हा शब्द किमान २०० वर्षे जुना आहे , १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देखील हा शब्द अस्तित्वात होता. १८५७ च्या उठावावेळीची एक प्रसिद्ध घोषणा होती " खुल्क खुदा का , मुल्क बादशाह का , अमल कुंपणी सरकारका " या मधले कुंपणी सरकार म्हणजे " ईस्ट इंडिया कंपनी " चे सरकार होय. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेला (१९४२) इंग्

समग्र रामदास ऍप

Image
" समग्र रामदास ऍप " समर्थ श्रीरामदासस्वामींच्या समग्र वाङ्मयाचा समावेश असणारे App ......जय जय रघुवीर समर्थ !! समर्थभक्त सज्जनहो, राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदासस्वामी महाराज ! सुमारे चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रदेशात नवचेतना निर्माण करणारे एक अलौकिक, अद्भुत आणि अद्वितीय संत ! बालवयातच विश्वाच्या चिंतेने व्याकूळ झालेल्या आणि अवघ्या बाराव्या वर्षीच ऐहिक सुखाचा त्याग करून श्रीरामरायाच्या अोढीने बाहेर पडलेल्या श्रीसमर्थांनी पुढे बारा वर्षे तपश्चर्या - पुरश्चरण करून श्रीरामाला प्रसन्न केले. तीर्थाटनातून हिंदुस्थानातील परकीय सावटाची जाणीव होताच संघटन करून कित्येक समाजविधायक कार्ये समर्थांनी केली. धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक इत्यादी सर्वच विषयांवर समर्थांनी चोख व आजच्या भाषेत सांगायचे तर अतिशय विज्ञानवादी मार्गदर्शन त्याकाळातच करून ठेवलेले आहे. काय त्यांची क्रांतदर्शी प्रतिभा ! आपल्या विपुल अशा वाङ्मयामधून आध्यात्मिकासोबतच व्यावहारिक विषयांवर समर्थांनी मांडलेले  विचार आजही जसेच्या तसे उपयोगी पडणारे आहेत. कारण तेच शाश्वत आहेत ! आजच्या प्रगत काळाची गरज ओळखून,