वनवास संपला, आता अग्निपरीक्षा !!!
जय श्रीराम ! सध्या श्रीराम मंदिर अयोध्या येथील कथित दान चोरी प्रकरणाने मोठाच जोर धरलेला आहे. या प्रकरणासंबंधित काही महत्वपूर्ण मुद्दे पाहणे आणि त्यांचा उहापोह करणे आवश्यक आहे. जेंव्हा ही अनियमितता ट्रस्ट च्या लक्षात आली, (४ जून २०२६) तेंव्हा स्वतः ट्रस्ट ने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचा आग्रह धरला. ट्रस्ट च्या आग्रहावरूनच विशेष चौकशी समितीचे गठन करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यातील तथ्ये समोर आणावी असाही आग्रह ट्रस्ट करत आहे. अर्थात " कर नाही तर डर कशाला " अश्याच बाण्याने, ट्रस्ट चौकशीचा आग्रह धरत आहे. खरी मेख इथेच आहे, जर ट्रस्टी कथित घोटाळेबाज असते तर हे प्रकरण प्रशासन दरबारी गेलेच नसते. परंतु असे होताना दिसले नाही याचाच अर्थ सदर प्रकरण ट्रस्टींनी संगनमताने किंवा कट कारस्थानाने घडवून आणलेले नाही. चौकशीला सामोरे जात असताना, पद अधिकार यांचा प्रभाव किंवा दबाव कोणावरही असू नये यासाठी ट्रस्टी मंडळींनी स्वतः आपले राजीनामे सादर केले आहेत. वास्तवात ज्या माननीय चंपतरायजींवर आरोप केले जात आहेत ते चंपतराय हे त्यांची प्राध्यापकी सोडून ऐन तारुण्यामध्ये श्रीराम मंदिर...