Posts

गांधी - सावरकर - गांधी

गांधी - सावरकर - गांधी © श्रीपाद श्रीकांत रामदासी   नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना , बापूजींचे पणतू ‘ तुषार गांधी ’ यांनी " बापूजींच्या हत्येमागे सावरकर हेच होते " असे विधान केल्याचे ३१ डिसेम्बर २०१८ रोजी , महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांतून आम्ही वाचले [ या वृत्ताची प्रत , संदर्भासाठी राखून ठेवलेली आहे ] गांधीजींची झालेली हत्या , ही दुःखदायकच होती यात दुमत नाही , परंतु त्या हत्येमध्ये वीर सावरकरांचे नाव विनाकारण गोवणे हे तेंव्हाही आणि आत्ताही , दुर्दैवीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. खरे तर गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग असण्याचे कोणतेच कारण नाही , किंवा सावरकरांना गांधीहत्या व्हावी असे वाटण्याचे कारणच काय ? सावरकर आपल्या भाषणांतून , लेखनातून गांधीजींवर टीका करत होते , हे तर जगजाहीरच आहे. सावरकर आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक विरोध हे काही लपून राहिले नव्हते , त्याचप्रमाणे गांधीजींवर टीका करणारे सावरकर हे काही एकटेच नव्हते. समकालीन नेते नव्हते , सावरकरांना जसे गांधींजींचे अति अहिंसेचे , मुस्लिम लांगूलचालनाचे वर्तन मान्य नव्हते , त्याच प्रमाणे डॉ. ...

सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार.. "रक्तदान महायज्ञ"

Image
सिंहगड रस्ता परिसरात संपन्न होणार रक्तदान महायज्ञ रक्तदान शिबिराच्या प्रथम वर्षीचे संकलन २७६ एकक , दुसऱ्या वर्षीचे संकलन ५१६ एकक , तिसऱ्या वर्षीचे संकलन ११७७ एकक. हे आकडे कोणाही बड्या नेत्याने किंवा व्यावसायिकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे नसून , विश्व हिंदू परिषद-बजरंग दल सिंहगड भागाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे.  होय! विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते , भारतीय सैन्यातील हुतात्मा जवान आणि हुतात्मा कारसेवक कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या शहराची रक्ताची गरज भागविण्यात हातभार लागावा , तसेच शक्य तितक्या गरजू रुग्णांचे प्राण वाचावेत यां करीताच हा रक्तदान रुपी सेवायज्ञ चेतवला जातो , म्हणूनच या उपक्रमाला  "रक्तदान महायज्ञ" असे नाव देण्यात आले आहे. मागील वर्षी एकाच दिवशी एकाच वेळी १५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ११७७ एकक रक्तसंकलन करण्यात यश मिळवले आहे.   या उपक्रमाची दखल घेत , पुणे शहरातील रक्तदान क्षेत्रात महत्वाची कामगिर...

वासुदेव गीत

Image
©   श्रीपाद श्रीकांत रामदासी वासुदेव आला हो वासुदेव आला रामच्या पारी हरिनाम बोला .... वासुदेव आला हो वासुदेव आला ।। धृ ।। आटपाट नगरात एक धनिक झाला काहीच कमी नव्हतं हो त्याला पैसा अन अडका भरून वाहिला तरीबी देई ना पसडा कोणाला ।। १।। रामच्या पारी हरिनाम बोला .... वासुदेव आला हो वासुदेव आला...... एके दिवशी बायको लाडे म्हणे त्याला गाडी घेऊन आपण ,   जाऊ फिरायला म्हणे धनिक तिला ,   राणी चिंता कशाला डायवर हाये बग आपल्या सेवेला ।। २ ।। रामच्या पारी हरिनाम बोला .... वासुदेव आला हो वासुदेव आला...... लगोलग सांगावा धाडला डायव्हरला म्हणती धावून येई सेवेला जायचे फिराया माझ्या राणीला कसा मी पाडू तिच्या शब्दाला ।। ३।।     रामच्या पारी हरिनाम बोला ....     वासुदेव आला हो वासुदेव आला...... निघाली जोडी दूरवर फिरायला नाही काही कमी त्यांच्या मौजेला पण काळानं त्यांच्यावर घातला घाला अवचित अपघात झाला गाडीला ।। ४ ।।     रामच्या पारी हरिनाम बोला ....     वासुदेव आला हो वासुदेव आला...... ...

सावरकरांना भारतरत्न का द्यावे ?

Image
।। श्रीराम ।। विनायक दामोदर सावरकर  २८ मे १८८३ - २६ फेब्रु. १९६६   दि. १६-११-२०१८   रोजी   वीर बाजी पासलकर स्मारक ,   सिंहगड रस्ता पुणे.  येथे केलेल्या भाषणाचा सारांश.... नमस्कार ! स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी , सावरकर प्रेमींच्या सह्या घेण्याचा उपक्रम श्री.सुनील मारणे सुरु करत आहेत. त्या संदर्भातील एका महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मला सावरकर अभ्यासक या नात्याने , सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? हा विषय मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्या प्रसंगी , ३५ मिनिटे चाललेल्या भाषणाचा सारांश वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. याप्रसंगी , श्री.सुनील मारणे , श्री.बाप्पू शिळमकर , श्री.प्रीतम बहिरट , श्री.केतन घोडके , स्तंभलेखक तुषार दामगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सावरकरांना भारतरत्न का द्यावे ? जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वां अहं यशोयुतां वंदे ।। स्वातंत्र्यदेवतेला भगवतीचे (देवीचे) रूप मानणारे आणि परवशतता , जातीय उच्चनीचतेच्या अंधकाराने हतबद्ध झालेल्या भारतीय जनतेस आपल्या...