Posts

लॉकडाऊन ऍट सोलापुर .....

Image
एक  सोलापुरी संवाद   (संपूर्णपणे काल्पनिक) मन्या : (मोबाईल वरील कॉल उचलत) ... हां बोल बे चन्या .... सक्काळ सक्काळ फोन केला ? चन्या : (फोनवरूनच ) का कराला ?? मन्या : का कराव... बसलो घरी गुमान ... काम ना धंधा बोल गोविंदा अशी कंडिशन झाली बग .... चन्या : हां बे माज बी तसंच झालय बे ... भाईर जावं तर पोलीस हंतेत बे धरून ... आमच्या बाजूचा बंड्या हाय ना ? मन्या : ते काळ्या तोंडाचं ढापणं ? चन्या : हां तेनीच बे ... तेला सांगायलेत सगळे, नको जाऊ बे...  नको जाऊ बे.. भायेर .. पन खाज बे बुडाला ....           गेला बग चौकात ... अरे बाप रे असा हाणले बे पोलीस .... कुत्र्यागत हाणले बे ... आता झाली का मज्जा ....           भायेर फिरायला बी येईना आनी एवढा सुजवलेत .... की घरी बूड टेकून बसता बी यीना... मन्या : म्हनून म्हनतो  पोलिसांचं ऐकावं बे... ... तेनी तरी किती सांगावं बे समजून  ...           लोकं बी येड्या डोक्याचेत ... मग काय करावं तेनी .... देतेत फटके रप्प किनी ... चन्...

सावध रहा राजा... आठवडा वैऱ्याचा आहे.

Image
हिंदुस्थानसह  देशामध्ये कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ सर्वश्रुतच आहे. हिंदुस्थानमध्ये अनेक बाधित रुग्ण नोंदवले गेले आहेत. संशयितांचा आकडा याहून अधिक असायची शक्यता आहे गेल्या पंधरवाड्यामध्ये  हे प्रमाण वाढले आहे. कालचा जनता कर्फ्यू जरी यशस्वी झाला असला तरी जनता कर्फ्यू औषध नाही. आज सकाळपासून बरेच नागरिक हे सोसायटी, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे येथे सर्रास वावरताना दिसत आहेत. अत्यावश्यक बाबींकरिता फिरणे मान्य आहे, परंतु अश्यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क किंवा रुमाल वापरणे हे अनिवार्य आहे हे विसरून चालणार नाही. आज इटली, चीन या देशातील नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेतली असती तर आज त्या देशांमध्ये मृत्यूने एवढे थैमान घातले नसते. सध्या चीन आणि इटलीच्या शासनाच्या नावाने खडेफोड करणारे सोशल मिडिया वीर स्वतः जबाबदारी पार पाडतायत का हे त्यांनी आत्मपरीक्षण करून पहावे. हिंदुस्थान आणि महाराष्ट्र शासन त्यांचे कार्य करतेच आहे, आता काही जण त्यावरही टीका टिंगल करताना दिसत आहेत, काही जण क्रेडिट वॉर खेळताना दिसत आहेत, पण बंधुनो...

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

Image
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला © श्रीपाद श्रीकांत रामदासी अंजन कांचन करवंदी तर कधी गडकोटांच्या चिरेबंदी यांनी संपन्न असणारा एक मंगलदायी प्रदेश म्हणजे; तुमचा आमचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा इतिहासाकडे अगदी सहज दृष्टी टाकली तर विविध क्षेत्रातल्या विविध परंपरांचे दर्शन घडते. या अनेक परंपरांमधील एक परंपरा म्हणजे संत परंपरा. महाराष्ट्रामध्ये अलौकिक असे अनेक संत होऊन गेले आणि त्यांनी आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला दिलेले आहे. संतांनी प्रबोधनाद्वारे निर्माण केलेल्या ज्ञानमंदिराच्या ओवरीवर आजही मराठी माणूस नतमस्तक होतो आणि अडचणीच्या काळामध्ये संतवचनांचे स्मरण करत मार्ग काढतो. या ज्ञानमंदिराकडे भक्तिमय मनःचक्षूंनी पाहिल्यावर समजतं की या ज्ञानमंदिराचा पाया माउली ज्ञानेश्वरांनी रचला, संत नामदेवादी संत सज्जनांनी त्याच्या भिंती उभारल्या तर जगतगुरु संत तुकाराम त्याचा कळस ठरले. थोडे आणखी पुढे जाऊन पाहिल्यास त्या कळसावर एक पताका फडकताना दिसते, त्या पताकेचा मंजुळ स्वर अस्पष्ट ऐकू येतो.... आणखी पुढे गेल्यावर त्या स्वराचे शब्द ऐकू येतात ..... गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ..... म...

अमर वीर हुतात्मा कोठारी बंधू

Image
                                                                                                    ।। जय श्रीराम ।। हुतात्मा कोठारी बंधू तो काळ १९८९ चा होता, अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनाने अवघा हिंदुस्थान भारावून गेला होता. प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीला स्वतंत्र करून, भारत मातेच्या मस्तकी असणारा परकीय आक्रमकांचा, कलंक पुसून टाकण्यासाठी हिंदू समाज व्याकुळ झाला होता. सप्टें १९८९ ला ठीक-ठिकाणी श्रीराम ज्योत पूजन करण्यात येत होते, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून कलकत्त्याचे दोन सख्खे बंधू रामकुमार आणि शरद कुमार कोठारी या २०-२२ वर्षाच्या तरुणांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. हे दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आधीपासून करीत होते आणि त्यावेळी ते द्वितीय वर्ष शिक्षित होते. कोठारी बंधूनी १०० हुन अधिक ठिकाणी "श्री रामज्योत प...

नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…

Image
खालील काव्यरचनेचा जीवित किंवा मृत कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही....  ______________________________________________________________________________ © श्रीपाद श्रीकांत रामदासी सर्व छयाचित्रे इंटरनेटवरून साभार ..... वैशाखाच्या वणव्यावरती... श्रावणाने धरली झारी ....  आणि मग उमटलं एक काल्पनिक बालगीत ....         नाच रे पोरा....     (चाल सांगण्याची गरज आहे का ?) नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच.... काळा काळा रोड खचला रे चिखलात टायर फसला रे रस्त्यावर छान छान खड्ड्यांची कमान ... कमानीत पडून त्या नाच ....  नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच.... गटारं सारी तुंबली रे शाळेची बस त्यात डुंबली रे दुरुस्तीच्या वेळी तुला देतो गोळी खाऊन गोळी ती नाच ... नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…. नाच रे पोरा नाच....  पावसाच्या सरी थांबतील रे     खड्डे सारे मग ते बुजतील रे खड्डे भरून घेऊन         विसरून जाऊन पुढच्या वर्षी पुन्हा तू नाच.. ...... नाच रे पोरा खड्ड...