Posts

सावरकर एक दीपस्तंभ : भाग ३ रा.

Image
 ज्वल-जहाल राजकारणी सावरकर.                   हिमाद्री तुंग शृंग से, प्रबुद्ध शुद्ध भारती                स्वयंप्रभा समुज्ज्वला, स्वतंत्रता पुकारती भारतीय राजकारणामध्ये हिंदूंचा पक्ष मांडणे म्हणजे स्वतः चे राजकीय अस्तित्व पणाला लावणे , असा प्रघात असणाऱ्या काळामध्ये सावरकरांची मुक्तता होणे ही हिंदु समाजाला एक पर्वणीच ठरली. सावरकरांची निर्वेध मुक्तता ही केवळ एका राजकीय नेत्याची किंवा व्यक्तीची मुक्तता नव्हती तर ती एका प्रभावी शक्तीची , राष्ट्रीय ध्येयवादाची मुक्तता होती , वाटेत   येईल त्याला भुईसपाट करण्याची रौद्रता असणाऱ्या झंझावाती वादळाचीच ही मुक्तता होती. सावरकरांचा काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच नव्हता.   स्वीकृत लोकशाही आणि राष्ट्रीय भूमिका यांपासून दूर गेलेल्या , मुसलमानांच्या राष्ट्रविघातक तसेच आक्रस्ताळी मागण्यांपुढे गुढगे टेकणाऱ्या , अहिंसेच्या नावाखाली विशिष्ठ व्यक्तींची हुकूमशाही असणाऱ्या ,   ओजहीन , निस्तेज , काँग्रेसमध्ये , सावरकरांसारख्या अविचल , स्फोटक ...

सावरकर एक दीपस्तंभ : भाग २ रा.

हिंदू सुधारक सावरकर सत्य आणि न्याय्य परंतु परखड विचार हीच सावरकरांच्या विचारधारेची ओळख आहे. सावरकर हे केवळ भाषणबाजी किंवा खर्डेखाशी करणारे बोलभांड सुधारक नव्हते ;  त्यांच्याकडे जशी वैचारिक बैठक होती तशीच कार्यतत्परता आणि सकारात्मक आचारशीलता देखील होती. सावरकरांनी चालवलेली अस्पृश्योद्धार चळवळ हि केवळ वृत्तपत्रे किंवा साप्ताहिकांतील लेखमालेपुरती मर्यादित कधीच नव्हती ,  दलितांच्या शाळा प्रवेशाप्रमाणेच मंदिर प्रवेशासाठी सावरकरांनी दंड थोपटले. तो काळ असा होता की काही कर्मठ धर्मांधांना, दलितवर्गाची सावली देखील हीन वाटत होती. दलितांच्या केवळ दर्शन घेण्याने ,  देवाला विटाळ होतो असे मानवतेच्या शत्रूंचे मत होते. अश्या मतिमंद कर्मठ धर्मांधांना, सावरकरांनी ठणकावून सांगितले कि ,  "  ज्याला विटाळ होतो तो देवच नाही. " आपल्या चळवळीबद्दल सांगताना सावरकर सांगत असत कि , "  माणसाच्या केवळ दर्शनाने ,  स्पर्शाने विटाळ होतो असे जे मानतात ,  ते स्वतःच मानवजातीवरचे कलंक आहेत. वस्तुतः तेच स्वतः पतित आहेत ,  खरा विटाळ ह्या असल्यांच्या स्पर्शाने झाला पाहिजे." अस्पृश्यता...

सावरकर एक दीपस्तंभ : भाग १ ला

Image
  संरक्षणाय हिंदूंनां, दंडनाय दुष्कृतां ।  हिन्दुत्वोत्थापनार्थाय, अजायत विनायक: ।। दुष्कृतांना दंड करून , हिंदूंचे संरक्षण करून , हिंदुत्वाचे उत्थापन करण्याकरता क्रान्तीविनायकाचे रत्नागिरीमध्ये ८ जानेवारी १९२४ रोजी आगमन झाले. त्यापूर्वी दोन दिवस म्हणजे ६ जानेवारीला सावरकरांची कारागृहातून सुटका करून , राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले. १९१० साली अंदमानात बद्ध झालेला क्रांतिकारकांचा राजपुत्र ; १९२४ साली येरवाड्यातून हिंदुहृदयसम्राट होण्याकरता रत्नागिरीस आला. ब्रह्मदेशाचा थिबा राजा जेथे नष्ट झाला ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी.   दि ६ जाने १९२४ रोजी , सावरकरांना याच रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. मोपला मुसलमानांनी केलेली हिंदूंची हत्या , देशावर अलीबंधूंनी आणलेली खिलापतची आफत , मुस्लिम समाजाला प्रमाणाबाहेर देण्यात येणारी सूट आणि या सर्वाला असणारा गांधीजींचा पाठिंबा , यामुळे हिंदुसमाजाचे राजकीय तसेच सामाजीक अस्तित्वच धोक्यात आले होते. त्यातच भरीस भर म्हणजे हिंदू समाजातील अंतर्गत उच्च-निचते मुळे , हिंदू समाज बहुसंख्य असूनही दुर्बल झा...