Posts

जागर हिंदुत्वाचा

Image
  विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांसाठी रचलेले एक मेळावा गीत.     जागर हिंदुत्वाचा ; करू जागर हिंदुत्वाचा || धृ. ||   औरंग्या गाडू हिंदुद्वेषाचा ; अफझुल्ल्या फाडू राष्ट्रद्रोहाचा अवघा हिंदू एकची आहे ; मंत्र जपू हा बंधुत्वाचा || १ | |   त्याग स्मरुनी शिव-शंभूचा ; ध्यास घेऊ हिंदुराज्याचा मंदिर भव्य करणे आहे ; ध्यास करू हा हिंदू हिंदूचा || २ ||   संकल्प करुनी गोसेवेचा ; आशिष घेऊ संतजनांचा उपदेश घेऊनि भग्वदगीतेचा ; वारसा जपू हा चक्रधराचा || ३ ||   बजरंगी होऊनी बजरंग दलाचा ; अवतार होऊया बजरंगाचा अवरोध होता दुष्ट दुर्जनांचा ; अवलंब करू लंकादहनाचा || ४ ||   दिक्षित होऊन हिंदू रक्षेचा ; प्रशिक्षित होऊन शस्त्रास्त्रांचा मार्ग क्रमूनी गोविंदसिंगांचा ; झेंडा रोवू हिंदुविजयाचा || ५ ||   जन्म आपुला शौर्यासाठी ; देव देश अन धर्मासाठी अभिषेक करुनि शत्रू रुधिराचा ; सन्मान करू भारत मातेचा || ६ ||   जागर हिंदुत्वाचा करू जागर हिंदुत्वाचा

तो नक्की आहे का ?

Image
  टिप : सदर कथा ही संपूर्णपणे काल्पनिक असून, याचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.  पहाटेचा बोचरा वारा अंगाला नुसता झोंबत होता. नुकताच पूर ओसरल्यामुळे गावगाडा हळूहळू जागेवर येत होता.  पहाटे ४:३० च्या सुमारास, डॉक्टर साहेबांना हाका मारत नीलकंठ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धावत आला.  केंद्रातील डॉक्टर राकेश यांना नुकताच डोळा लागत होता, नीलकंठचा आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले.  नीलकंठ धापा टाकतच म्हणाला " सरपंचांना छातीत दुखतंय, लै त्रास होतोय जरा येताव का ? " डॉ. राकेशने तात्काळ आपली बॅग उचलली आणि सरपंचांच्या घरी पोहोचले, तपासणी करताना लक्षात आले की हा सौम्य हृदयविकाराचा झटका आहे.  अश्या रुग्णांना आवश्यक सुविधा केंद्रात उपलब्ध नव्हती, आणि तालुक्याहुन ऍम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्याची शक्यता पण कमी होती .... त्यांनी सांगितले की; " मोठ्या गाडीची सोया करा ... तालुक्याला न्यावे लागेल. " खरं तर हे सांगितल्यावर स्वतः डॉक्टरांनाच कसे तरी वाटले; कारण पुरात गावातल्या बहुतेक गाड्या खराब झाल्या होत्या... नाही म्हणायला रंगराव देशमुखांची  गाडी तेव्हढी वाचली हो...

..... अजब तुझे सरकार !

Image
  ।। राम कृष्ण हरी ।। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर, आळंदी, देहू आणि अन्य संत क्षेत्रांमध्ये येत असणाऱ्या  वारकरी मंडळींना सरकारी पातळीवर  त्रास देण्यात येत आहे.  खांद्यावरच्या भगव्या पताका काढून घेतल्या जात आहेत, पारंपरिक वारकरी वेष देखील काढण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे.  जे परकीय औरंगजेबाला जमले नाही, इंग्रजांना जमले नाही ते आमचे स्वकीय सरकार करून दाखवत आहे.   या सरकारी संकटाला नेमके आस्मानी म्हणावे की सुलतानी ? म्हणावे तेच कळत नाही.   आरोग्यविषय  सर्वप्रकारचे  निकष आणि नियम पाळून, वारी करण्यासाठी वारकऱ्यांनी केलेली मागणी देखील धुडकावून लावण्यात आली आहे.  एकादशीला संताच्या मांदियाळीने गजबजलेली पंढरी आज मात्र पाखंड्यांच्या मनमानी अधर्माने वेढली गेलेली पाहून मन हळहळते आहे. त्याच हळहळत्या मनातील भावना आज आपल्यापुढे मांडत आहे.  नाही यंदा दिंडी अन नाही वारकरी  सांग विठुराया; कशी घडावी तुझी वारी ।। धृ ।। चालली एकटी माउली; शल्य हे मनी विखारी  भक्ती विना जगती ते त्रैलोक्याचे भिखारी  ।। १ ।। येता चालत ओढ...

सागर-भेटीची १११ वर्षे : मार्सेलिस १९१०

Image
  ८ जुलै १९१० , ब्रिटिशांची एक नौका फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ येत होती. या नौकेमध्ये ब्रिटिशांचा एक कैदी   याच क्षणाची वाट पाहत होता. कैद्याला हवी असलेली वेळ आली आणि कैद्याने , स्वच्छता गृहात जाण्यासाठी आरक्षींची (पोलीस) परवानगी मागितली. आरक्षी त्याला स्वच्छता गृहात सोडून बाहेर पहारा देत उभे राहिले. हा कैदी   काही साधा-सुधा नव्हता , या कैद्यावर आरोप होते , राजद्रोहाचे , ब्रिटिशांविरुद्ध कारस्थान करण्याचे. हा कैदी भारतातून लंडनमध्ये बॅरिस्टर होण्याचे निमित्त करून शिकायला आला. तो इंग्लंड मध्ये येण्यापूर्वीच त्याच्या भारतातील कारवायांचा रिपोर्ट तिथे पोहोचला होता.   त्या कैद्याचा पूर्वेतिहास पाहून लंडन मध्ये पाय ठेवल्यापासून त्याच्या मागे ब्रिटिश गुप्तहेरांचा ससेमिरा लागला होता. पण तरीही हा कैदी बॉम्ब बनवण्याचा विधी भारतात पाठवण्यात यशस्वी झाला , या कैद्याने गुप्तपणे पिस्तुले देखील भारतात पाठवली होती. त्याने ब्रिटिशांचा याहुन एक भयंकर गुन्हा केला होता , तो म्हणजे लंडन मधील इंग्रजाळलेल्या सुखलोलुप भारतीय तरुणांच्या मनात स्वराष्ट्रभक्ती जागृत करून बंडखोरांची एक...

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

Image
 छायाचित्र श्रेय : श्रीपाद श्रीकांत रामदासी  शिवरायांसी आठवावे , जीवित तृणवत मानावे ।। इहलोकी परलोकी उरावे , कीर्ती रूपे ।। या लेखांच्या पूर्वार्धातून,   छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती , स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती , धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न …. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजांनी स्वतःस (राजा या भूमिकेतून ) केंद्र स्थानी ठेऊन , अष्टप्रधान मंडळाची रचना तशीच चालू ठेवली होती . स्वराज्याची महसूल व्यवस्था प्रांत रचना , न्याय व्यवस्था , मुलकी कारभाराच्या व्यवस्था , देशमुख-देशकुलकर्णी यांचे अधिकार आदी बाबी तश्याच पुढे चालू ठेवल्या होत्या. इंग्रज-पोर्तुगीज-डच आदी व्यापारी मंडळींसोबत असणारे करार-मदार देखील तसेच पुढे चालू ठेवले होते. संभाजीराजांनी एकाच वेळी अनेक शत्रूंशी झुंज देत , स्वराज्याचे रक्षण केले आणि विस्तारही केला हे सर्वश्रुत आहेच. परंतु कल...